Saturday, December 29, 2012

Sandip Khare - Kavita 1

Wednesday, December 26, 2012

Quotes from Book "TOCH CHANDRAMA"

१. सारे जरि ते तसेच धुंदी आज ती कुठे?
    मीहि तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
    ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी
    एकांती मजसमीप तीच तूही कामिनी!

२. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
     अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
     जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्याला
     माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

३. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
    मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे!

४. मी डोलकर डोलकर, डोलकर दर्याचा राजा
     घर पान्यामंदी बंदराला करतो ये जा!


Author : – Shanta Shelake
Book : - Toch Chandrama…
 
 
 
 
 
 
 
 

Friday, December 21, 2012

Quotes from Book "VYAKTI AANI VALLI"






१. मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांचे 'भय्या' आणि 'मद्राशी' असे दोन स्थल विभाग मी करू शकतो. विभाग जरा स्थूल वाटला तर 'वानियाभय' असेल असा अंदाज. ह्या वानियाभायामध्ये मारवाड, गुजरात, बंगाल सारे येतात. 'शीख' ओळखता येतो; पण कालचा शीख आज ओळखता येत नाही."

२. "अहो कसला गांधी? जगभर गेला; पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो! त्यास नेमकं ठाऊक इथं त्याच्या पंच्याच कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्यापेक्षाही उघडे! शुताबितात तथ्य नाही हो! आमचा शंभूभट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला. ब्रिटीश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील कधी घाबरला नाही! तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं! इथे निम्मं कोकण उपाशी! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक, आम्हास कसलं"?


Author : – Pu. La. Deshpande
Book : - Vyakti Aani Valli








Saturday, December 15, 2012

Quotes from Book "VIDHAVAKUMARI"

१. खोटं म्हणजे काय?
    जे माणसाला सुचतं, पण देवाला रुचत नाही ते खोटं.













Author : – Mama Varerkar
Book : - VIDHAVA KUMARI
 
 
 
 
 
 

Monday, December 10, 2012

Quotes from Book "AMRUTVEL"

१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
 
 
 
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही. 
 
Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Amrutvel









Video