Thursday, October 8, 2015

विपांकपर्व



लेखक: श्रीराम खाडिलकर
प्रकार: चरित्र लेखन

प्रसिद्ध शिल्पकार 'करमरकर' यांच्याबद्दल आज फार थोड्या लोकांना माहित असेल. त्यांनी निर्माण केलेली शिल्पे आपण ठिकठिकाणी पाहतो आणि वेळोवेळी त्याची वाहवा हि करतो; पण त्यांचा शिल्पकार काहीसा विस्मृतीत गेला आहे. त्याचसाठी लेखक श्रीराम खाडिलकर यांनी, 'करमरकर' यांच्या कारकीर्दीचा आणि एकूणच त्यांच्या आयुष्यावर अभ्यास करून या पुस्तकाच्या रूपाने मांडला आहे.

मुळात हे पुस्तक जरी चरित्र लेखन असले, तरी स्वत: कलाकार प्रवृत्तीच्या खाडिलकर यांनी 'करमरकर' यांच्या अनेक शिल्पांचा जो तपशीलवार खुलासा केला आहे तो खरच वाचनीय आहे. 'करमरकर' यांचासारख्या महाराष्ट्राला आणि भारताला भूषणावह असलेल्या कलाकारच्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल लेखकाचे धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावे असे सुज्ञ वाचकांना आवाहन. 

No comments:

Video